बेळगावमध्ये एका महिला रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने मदत करत नसीम शेख यांनी समाजासमोर माणुसकीचा आदर्श ठेवला आहे.

बेळगावच्या रेल्वे बसस्थानकाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. घटनास्थळी रुग्णवाहिका येण्यास उशीर होत असल्याचे पाहून तेथेच उपस्थित असलेल्या महिला रिक्षाचालक नसीम शेख यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुढाकार घेतला. जखमी व्यक्ती मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाल्याचे पाहून त्यांनी उपस्थितांच्या मदतीने त्या व्यक्तीला स्वतःच्या रिक्षात बसवले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
नसीम शेख यांच्या या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचले. रुग्णवाहिकेची वाट पाहत बसलो असतो तर अनर्थ घडला असता, कोणाचा तरी जीव वाचवणे हीच आपली प्राथमिकता होती अशी प्रतिक्रिया नसीम शेख यांनी व्यक्त केली.
समाजात आजही माणुसकी जिवंत असल्याचे नसीम शेख यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या या धाडसाचे आणि सेवाभावी वृत्तीचे बेळगाव परिसरात सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.


Recent Comments