भारतीय बौद्ध महासभा आणि शताब्दी समितीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निपाणी भेटीच्या शताब्दी वर्षानिमित्त १ मार्च रोजी भव्य ‘धम्म परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वाय. पी. गडीनायक यांनी दिली. या धम्म परिषदेसाठी प्रसिद्ध लेखक आणि वक्ते जगदीश मोहोळ हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तर कर्नाटक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मनोहर मोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. याप्रसंगी शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येईल, असे वाय. पी. गडीनायक यांनी सांगितले.
निपाणी शहर हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र राहिले असून बाबासाहेबांनी या ठिकाणी आठ वेळा भेट दिली होती. आंबेडकर कुटुंबातील तीन पिढ्यांचे या भूमीला मार्गदर्शन लाभल्याने या नगरीला ‘धम्मभूमी’ म्हणून ओळखले जाते. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर होणाऱ्या धम्म परिषदेला बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले.
या पत्रकार परिषदेला अजित कांबळे, उदय वंटे, जनार्दन मोहिते, सुशील कांबळे, दिलीप कांबळे, राजेंद्र कांबळे, दीपक मेत्री, कल्लाप्पा चौगुले आ


Recent Comments