संतानाच्या प्रतीक्षेत असलेल्या दांपत्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्यासाठी मिरज येथील नामांकित ‘सचिन हॉस्पिटल’ आणि ‘इंटरनॅशनल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’तर्फे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मिरजमधील सचिन हॉस्पिटलमध्ये हे शिबिर पार पडणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि दांपत्यांमधील आत्मविश्वास वाढवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या दांपत्यांची तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी केली जाईल. तसेच ज्यांना शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांना विशेष सवलत दिली जाणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक यावेळी उपलब्ध असेल. प्रामुख्याने स्त्री वंध्यत्व, पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता, गर्भाशयातील गाठी, बंद फॅलोपिअन ट्यूब आणि वारंवार होणारा गर्भपात अशा गंभीर समस्यांवर येथे सखोल चर्चा व उपचार सुचवले जातील.
हॉस्पिटलमधील अत्याधुनिक आयव्हीएफ (IVF) लॅब, स्पर्म बँक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची माहितीही यावेळी दिली जाईल. लैंगिक समस्या आणि विवाहात्तर शारीरिक कमकुवतपणावरही तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. मिरज येथील छत्रपती शिवाजी रोडवरील हॉटेल प्रियदर्शनी जवळ असलेल्या सचिन हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन (MD): 9422580842 / ९७६५०१०८३४ तसेच डॉ. नेहा (MD): ९४२१९३२४०१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments