बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावात रस्ता निर्मिती कामाचे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी भूमिपूजन केले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.



मण्णूर ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विशेष प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला आहे. प्रत्येक गावाच्या विकासातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला संकल्प असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधीने ठरवले तर मतदारसंघाचा चेहरामोहरा कसा बदलता येतो, हे मी कामातून दाखवून देत आहे, अशी भावना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.


याप्रसंगी काडा अध्यक्ष युवराज कदम, एस. एल. चौगुले, अशोक चौगुले, मुकुंद तरळे, जयवंत बाळकुंद्री, दत्तू चौगुले, ज्योतिबा चौगुले आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मतदारसंघातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांना आपण प्राधान्य देत असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी नमूद केले.



Recent Comments