महाशिवरात्रीच्या पावन पर्वा निमित्त बेळगावच्या शाहू नगर आणि नेहरू नगर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाप्रसादाचा आठ हजारांहून अधिक शिवभक्तांनी लाभ घेतला.


बेळगावच्या शाहू नगर आणि नेहरू नगरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच विविध पूजाविधी पार पडले असून दुपारी आयोजित भव्य महाप्रसाद वितरण सोहळ्यात आठ हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. या भागातील ट्रस्टचे सदस्य आणि नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे नियोजन केले होते.


या भक्ती सोहळ्याला खासदार जगदीश शेट्टर, केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, माजी ग्रामीण आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव, मुर्गेंद्रगौडा पाटील, माजी महापौर रेश्मा प्रवीण पाटील, महानगरपालिका सदस्य श्रेयस नाकडी, चेअरमन श्रीकांत कदम आणि रेडेकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिवदर्शन घेऊन या सेवाकार्याचे कौतुक केले.



Recent Comments