Belagavi

​दावणगेरेचा मंजुनाथ ठरला ‘मिस्टर कर्नाटक क्लासिक’चा मानकरी

Share

​दावणगेरेच्या मंजुनाथने राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बाजी मारत ‘मिस्टर कर्नाटक क्लासिक २०२६’ चे विजेतेपद पटकावले आहे.

​या स्पर्धेत प्रशांत खन्नूकरने प्रथम उपविजेतेपद, तर अमन शेखने द्वितीय उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच उमेश गंगाणे याला ‘बेस्ट पोझर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

६० किलो वजनी गटात उमेश गंगाणे, ८० किलो गटात प्रशांत खन्नूकर, ८५ किलो गटात अमन शेख आणि ७५ किलो गटात इख्लास कुरेशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ५५ किलो गटात कृष्णप्रसाद, ७० किलो गटात शरणू आणि ६५ किलो गटात इम्तियाज आनेर यांनी यश संपादन केले आहे.

Tags: