बेळगावच्या रामतीर्थ नगरमधील रहिवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमदार आसिफ सेठ यांनी ‘बुडा’च्या माध्यमातून ४ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन करून स्थानिकांना मोठा दिलासा दिला आहे.

बेळगावातील रामतीर्थ नगरमध्ये ‘बुडा’मार्फत ४ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास, गटारी आणि पेव्हर्स बसवण्याच्या कामांना आमदार आसिफ सेठ यांनी हिरवा कंदील दाखवला. हे नगर आता महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले असले, तरी बुडाच्या अखत्यारीतील उर्वरित कामे त्याच निधीतून पूर्ण केली जात आहेत. पुढील टप्प्यात उर्वरित भागासाठी पुन्हा ४ कोटींचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही आसिफ सेठ यांनी दिली.
रस्ते आणि अंतर्गत सुधारणेसाठी आमदारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत परिसरातील रहिवाशांनी आमदार आसिफ सेठ यांचे आभार मानले आहेत.
याप्रसंगी माजी नगरसेविका पुष्पा पर्वतराव, अमान सेठ, सुरेश यादव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments