Belagavi

बेळगावात महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला चोप

Share

बेळगावमधील रामदेव हॉटेल परिसरातील एका पेट्रोल पंपावर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या कर्मचाऱ्याने महिलेचा अपमान केल्यामुळे हा वाद उफाळून आला.

बेळगावमधील रामदेव हॉटेल जवळील शेल पेट्रोल पंपावर आज ही घटना घडली. एका महिलेने कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर चाकांमध्ये हवा भरण्यासाठी कर्मचाऱ्याला विचारणा केली. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने त्या महिलेशी अत्यंत उद्धटपणे वर्तन केले. तसेच पैसे तोंडावर फेकून देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तातडीने आपल्या पतीला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. महिलेचा पती आल्यानंतर त्याचे आणि संबंधित कर्मचाऱ्याचे जोरदार भांडण झाले. आपल्या पत्नीची माफी मागावी, अशी मागणी पतीने लावून धरली होती. मात्र, चूक असूनही माफी न मागणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुजोरपणामुळे पतीचा संयम सुटला. यानंतर महिलेचा पती आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मिळून त्या कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला.

ही सर्व घटना बेळगावमधील माळ मारुती पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत घडली आहे.

Tags: