बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विविध विभागांसोबत सध्या बैठका सुरू असून लवकरच अर्थसंकल्पाची तारीख निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीचा आढावा घेतला असून तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले.
आमदारांच्या परदेश दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्य आपापल्या स्वखर्चाने परदेश दौऱ्यावर जात असल्याची माहिती सिद्धरामय्या यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी नेतृत्व बदलाबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकारांनी वारंवार तोच प्रश्न विचारू नये, नेतृत्व बदलाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही वागू, अशी प्रतिक्रिया सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.


Recent Comments