Belagavi

आई-वडिलांच्या स्मरणार्थ भोबे बंधूंकडून विठ्ठल-रखुमाई मंदिराला देणगी

Share

बेळगावातील बापट गल्ली येथील श्री विठ्ठल-रखुमाई भजन मंडळाला भोबे बंधूंनी दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ आवश्यक वस्तूंची देणगी दिली. यावेळी मंडळाचे सदस्य, मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.

बापट गल्लीतील कार पार्किंग परिसरात असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई भजन मंडळाला डॉ. संतोष नरहरी भोबे आणि बबन भोबे बंधूंनी दिवंगत आई जयश्री भोबे आणि वडील नरहरी भोबे यांच्या स्मरणार्थ दोन जाजम आणि नैवेद्यासाठी पाच ताटे अर्पण केली.

यावेळी श्रीकांत सांबरेकर, श्री पुनेकर महाराज, प्रभाकर कणबर्गी, उदय पाटील, मधु कणबर्गी, बंडू केरवाडकर, पांडुरंग पाटील, राजू पवार यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.

Tags: