Belagavi

फुलपिच क्रिकेट स्पर्धेत हनुमान तालीम संघाचा विजेतेपदावर कब्जा

Share

बेळगावातील कामत गल्ली येथील शिवशक्ती युवक मंडळातर्फे आयोजित फुलपिच क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात संयुक्त हनुमान तालीम मेनसे गल्ली संघाने विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात ब्रह्मलिंग ११ (आझाद गल्ली) संघाचा पराभव करत हनुमान तालीम संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रह्मलिंग ११ संघाने सहा षटकांत ३७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हनुमान तालीम संघाच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत पाच षटकांतच ३७ धावांचे लक्ष्य गाठले. एक षटक शिल्लक असतानाच संघाने विजय मिळवला.

प्रायोजक विशाल तशीलदार यांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मालिकावीर म्हणून हृषिकेश राजपूत, उत्कृष्ट फलंदाज म्हणून शंभू, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सौरभ कदम, अंतिम सामनावीर म्हणून स्वस्तिक यांची निवड करण्यात आली. मयुरेश घसारी आणि प्रणव बडस्कर यांना उदयोन्मुख खेळाडू, तर गीतन कडेमनी यांना ज्येष्ठ खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी राजू पाटील, सिद्धाप्पा कुट्रे, चिंतामणी घसारी, अनिल बडमंजी, दीपक गायकवाड, इरफान बाळेकुंद्री, विजय मोहिते, राजू हळगेकर यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. जयसिंग राजपूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Tags: