Vijayapura

शॉर्ट सर्किटमुळे ६ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे ७ लाख रुपयांचे नुकसान

Share

शॉर्ट सर्किटमुळे उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना सिंदगी तालुक्यात घडली आहे. ६ एकर शेतातील पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बळीराजा संकटात सापडला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील सुंगठाण गावात विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ६ एकर शेतातील उभा ऊस जळून खाक झाला आहे. हणमंतप्पा गुरुलींगप्पा बिरादार उर्फ कुरनळ्ळी यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागल्याने सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंदगी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे.

Tags: