बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कल्लेहोळ येथे ५० लाख रुपयांच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ते आणि शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.


बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कल्लेहोळ गावात सुमारे ५० लाख रुपये खर्चाच्या नवीन रस्ते विकास कामासह सरकारी वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेच्या २ अतिरिक्त खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह या कामांना शास्त्रोक्त पद्धतीने सुरुवात करून दिली.

ग्रामीण मतदारसंघाचा विकास सातत्याने सुरू असून मूलभूत सोयी-सुविधांसह मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. जनतेने त्यांना खंबीर पाठिंबा देऊन साथ द्यावी, असे आवाहन मृणाल हेब्बाळकर यांनी केले.
या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, काडा अध्यक्ष युवराज कदम, महेश पाटील, संजय पाटील, बाळू देसूरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments