विजापूर शहर आणि परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रात्री ११ वाजून ४३ मिनिटांच्या सुमारास जमीन हादरल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. विशेषतः शहराच्या बाहेरील भागातही या कंपनांची तीव्रता जाणवली असून नागरिक घराबाहेर पडले.
विजापूर शहरात रात्री ११.४३ च्या सुमारास जमिनीला जोरदार धक्के बसले. जमिनीतून प्रचंड मोठा आवाज आल्याने लोक भयभीत झाले. केवळ शहरच नाही, तर शहराच्या उपनगरीय भागातही हे धक्के जाणवले आहेत. प्रामुख्याने आदर्श नगर, भूतनाळ आणि पाणी नगर परिसरात भूकंपाचा परिणाम अधिक दिसून आला. अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.


Recent Comments