Belagavi

खनगाव खुर्द : छत्र. शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन

Share

बेळगाव तालुक्यातील खनगाव के.एच. येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज या पुतळ्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.

याप्रसंगी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, “स्त्रियांचा आदर आणि रयतेचे रक्षण करणाऱ्या शिवप्रभूंचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत. महाराजांचा हा भव्य पुतळा येणाऱ्या पिढीला त्यांच्या शौर्याची आणि आदर्शांची सदैव आठवण करून देईल.”

या सोहळ्याला विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच म.नि.प्र. शिवमुर्ती देवरू अरळीकट्टी, श्रीशैल स्वामीजी आणि राजू सुळेभावी स्वामीजी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. यावेळी महेश पाटील, बाबाजी करडी यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: