अंधश्रद्धेच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अमानवीय अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आली आहे. बेळगावमध्ये अघोरी कृत्यासाठी एका रेडकाच्या पिल्लाचा बळी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत एका रेडकाच्या पिल्लाचा गूढरीत्या मृत्यू झाला होता. सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी अघोरी कृत्य झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावर मिळालेले साहित्य आणि पिल्लाची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यावरून हे कृत्य अंधश्रद्धेतूनच केल्याचे समोर आले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गंभीर घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. कोणत्याही मुक्या प्राण्यांचा असा क्रूर बळी देऊ नका आणि अशा अघोरी प्रथांना थारा देऊ नका, असे आवाहन अवधूत तुडवेकर यांनी केले. या प्रकरणातील दोषींवर पोलीस कठोर कारवाई करतील, अशी खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



Recent Comments