Belagavi

यळ्ळूरच्या सुपुत्रांसह लेकींचीही झेप

Share

युवक युवतींनी आपले भवितव्य घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, आई वडिलांची आज्ञा पाळावी, आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे प्रतिपाद‌न प्रा.इंद्रजित मोरे यांनी श्री ह‌णमंतगौड ध्रुवनिधी ट्रस्ट येळ्ळूर तर्फे 2025-26 साली सैन्यदलात भरती झालेल्या येळ्ळूर मधील युवक,युवती व जवानांच्या आई वडिलांच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष सी. बी. पाटील होते.

येळ्ळूर गावातील युवती सैन्यदलात भरती होण्याचे श्रेय अर्थात सैन्यदलात महिलांना सहभागी होण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री माननीय शरदराव पवार यांना जाते. त्यांनी महिलांसाठी पुरक नियम बदल केले आहेत. पहलगाम हल्ल्यात भारतीय सैन्यात दोन महिलांनी शौर्य दाखविले आहे. असे विचार प्रमुख वक्त्या या नात्याने बोलताना ॲड . सरिता स. पाटील यांनी व्यक्त केले.

श्री चांगळेश्वरी मंदिराच्या प्रांगणात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी श्री हणमंत गौड ट्रस्टने अनेक कार्ये केली आहेत त्याला अनुसरण प्रतिवर्षी अशा कार्यक्रमांची भर घालूया, येळ्ळूर गावाच्या सर्वागिण विकासासाठी जे जे उत्तम उदात होईल त्याला मदत केली पाहिजे. सकारात्मक विचार हे सर्वांना तारणारे आहेत. सर्वांना सामंजस्याने बरोबर घेवून ट्रस्टचे कार्य प्रगतीपथावर नेवूया असे विचार कार्यक्र‌माच्या अध्यक्षस्थानावरून अध्यक्ष सी. बी. पाटील यानी मांडले.

प्रारंभी चांगळेश्वरी देवीचे पुजन अॅडव्होकेट सौ. सरिता पाटील, प्राध्यापक इंद्रजित मोरे व सी.बी.पाटील यांनी केले, मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निवृत्त शिक्षक आनंद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

Tags: