विजापूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी शहरातील देवर हिप्परगी रस्त्यावर एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. साखर कारखान्यातून मळी भरून जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट खोल दरीत कोसळला असून, या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला आहे.
बसवण बागेवाडी येथील देवर हिप्परगी मार्गावरून मळीची वाहतूक होत असताना ही घटना घडली. भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याशेजारील खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच बसवण बागेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी जखमी चालकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे बसवण बागेवाडी पोलिसांनी सांगितले.


Recent Comments