Belagavi

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा जैन श्वेतांबर समाजाकडून गौरव

Share

केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केल्याने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर, जैन श्वेतांबर समाजाच्या वतीने डॉ. कोरे यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल जैन श्वेतांबर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उत्तर कर्नाटकातील शैक्षणिक क्रांती आणि कोरे यांनी केलेली समाजसेवा यावर यावेळी मान्यवरांनी प्रकाश टाकला. या प्रसंगी जैन श्वेतांबर समाजाचे चेअरमन विजय पोरवाल, विजय संघवी यांच्यासह समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. “डॉ. प्रभाकर कोरे यांना मिळालेला पद्मश्री सन्मान हा त्यांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव आहे,” अशी भावना विजय पोरवाल यांनी व्यक्त केली.

आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी समाजाच्या या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला श्वेतांबर जैन समाजातील शेकडो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते, ज्यांनी कोरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: