बेळगावच्या काहेर विद्यापीठाच्या जे. एन. मेडिकल कॉलेजमधील जनरल मेडिसिन विभागाचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश मोर्कर यांना पाटणा येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ‘इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन’ फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले.


असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या ८१ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे. बिहार विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिनेश चंद्रा राय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर ज्ञानेश मोर्कर यांनी मधुमेह, रक्तदाब, एचआयव्ही आणि संसर्गजन्य रोगांच्या क्षेत्रात केलेले सखोल संशोधन तसेच रुग्णसेवेतील त्यांचे योगदान विचारात घेऊन हा सर्वोच्च सन्मान त्यांना जाहीर झाला. त्यांच्या या यशामुळे बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्राची मान उंचावली आहे.
सध्या जेएनएमसीमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर मोर्कर यांचे संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहेत. पाटणा येथील या अधिवेशनात प्रा. जी. नरसिंहमुलू आणि डॉक्टर पुनीत सक्सेना यांच्यासह देशातील अनेक दिग्गज डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाबद्दल बेळगावमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Recent Comments