विजापूर शहरातील हेस्कॉम कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने हेस्कॉम कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांवर हेस्कॉम अधिकाऱ्यांनी दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि शेतीपंपांना नियमित वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत अधिकारी ठोस निर्णय घेत नाहीत आणि दाखल गुन्हे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


Recent Comments