Belagavi

​बेळगावात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना एसपींचा इशारा

Share

​बेळगाव जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक आणि रस्ते देखभालीकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर असतील.

​बेळगाव जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी कडक पावले उचलली आहेत. ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजाचे संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर आणि महामार्ग देखभालीत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

​बेळगाव पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. विशेषतः ट्रॅक्टरमध्ये कर्कश आवाजाचे स्पीकर्स लावून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांकडून २०० हून अधिक स्पीकर्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असून, नियम न पाळल्यास अशी वाहने जप्त केली जातील, असे के. रामराजन यांनी स्पष्ट केले. गेल्या जानेवारीत अपघातात ८४ जणांचा मृत्यू झाला होता, यंदा ही संख्या ६८ वर आली असल्याची माहिती त्यांनी दिली. महामार्गावर लेन मार्किंग नसल्यामुळे अपघात होत असून, तातडीने मार्किंग न केल्यास संबंधित अभियंत्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा सज्जड दम के. रामराजन यांनी दिला आहे.

Tags: