विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हाविनाळ येथे असलेल्या दत्ता साखर कारखान्यात बुधवारी भीषण स्फोट झाला. कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हाविनाळ येथील दत्ता साखर कारखान्यात बुधवारी अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, क्षणात कारखान्याच्या परिसरात आगीचे लोट पसरले आणि संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. या आगीत कारखान्याची मोठी हानी झाली असून यंत्रसामग्री जळून खाक झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही घटना चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.


Recent Comments