बेळगावात येत्या १२ फेब्रुवारीपासून ‘ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेले अनेक युवा खेळाडू मैदानात उतरणार असून, विजेत्यांना लाखांची बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी दिली आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी या भव्य क्रीडा सोहळ्याची सविस्तर माहिती दिली. देशातील विविध प्रांतांतील प्रतिभावान खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १२ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत ११ दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे आयपीएल गाजवलेले अनेक युवा खेळाडू यात सहभागी होणार असल्याचे मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी सांगितले.
या प्रतिष्ठित स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम पारितोषिक ५,२७,127 रुपये रोख आणि चषक, तर द्वितीय पारितोषिक २,५१,१२७ रुपये रोख आणि चषक असे स्वरूप आहे. तसेच स्पर्धेतील मालिकावीरासाठी आकर्षक ‘स्कूटी’ देण्यात येणार असल्याचे मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेत एकूण ४८ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. सद्यस्थितीत उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा यांसह विविध राज्यांतील ४० संघांनी आपली नावनोंदणी निश्चित केली असून उर्वरित ८ जागांसाठी मोठी चढाओढ सुरू आहे. आयपीएलमधील युवा खेळाडूंच्या उपस्थितीमुळे बेळगावमधील क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक मोठी मेजवानी ठरणार असल्याचे मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी नमूद केले.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघासाठी १५,००० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून, इच्छुक संघांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी केले आहे.


Recent Comments