कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सफाई कर्मचारी घटकाच्या प्रदेशाध्यक्षांच्या मंजुरीनंतर, बेळगाव जिल्हा ग्रामीण सफाई कर्मचारी काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक सरचिटणीसपदी गजानन कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हाध्यक्ष राजू गंगप्पा पाटी यांनी या नियुक्तीचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी सक्रियपणे काम करावे, अशा सूचना त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नवनियुक्त सरचिटणीस गजानन कांबळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासोबतच संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले असून, पक्षाची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास जिल्हा घटकाने व्यक्त केला आहे.


Recent Comments