Belagavi

बेळगाव ग्रामीणमध्ये ‘लेडी सिंगम’चा धडाका; अवैध खाणकाम करणाऱ्या दंकेखोरांचे धाबे दणाणले

Share

बेळगाव ग्रामीण भागातील सीमावर्ती भागात सुरू असलेल्या अवैध खाणकामाच्या दंध्याला खाण आणि भूविज्ञान विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने थेट आव्हान दिले आहे. तक्रारींची दखल घेत कोणतीही पूर्वसूचना न देता या महिला अधिकाऱ्याने घटनास्थळी धाड टाकत अवैध उत्खनन करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

खाण आणि भूविज्ञान विभागाच्या अधिकारी बिंदन पाटील यांनी नियमांची पायमल्ली करून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या दंकेखोरांच्या डोळ्याला डोळा भिडवून हे अवैध काम तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. दंकेखोर कितीही प्रभावशाली असले तरी त्यांना न डगमगता बिंदन पाटील यांनी नियमांचा पाठ शिकवला आणि बेकायदा कारवायांना चाप लावला. त्यांच्या या धाडसी कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनास्थळी दंकेखोरांनी धमकावण्याचा प्रयत्न करूनही त्यांना न जुमानता बिंदन पाटील यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या या धडक कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी त्यांना ‘कर्तव्यनिष्ठ अधिकारी’ म्हणून गौरवले आहे. या कारवाईमुळे बेळगावातील अवैध खाणकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags: