विजयपूर येथील पोलीस मुख्यालय परिसरातील श्री रेणुका यल्लाम्मा देवी मंदिराचा आठवा वार्षिक महोत्सवाचा सोहळा रविवारी, १ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बडवार भारत पौर्णिमेच्या औचित्याने आयोजित या महोत्सवात सकाळी ७ वाजल्यापासून विधीवत कार्यक्रमांना सुरुवात होईल. सकाळी ७ वाजता देवीचा अभिषेक, ८ वाजता पूजा व अलंकार, तर ९ वाजता देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ‘चौडकी पद’ आणि ‘करडी मजल’ या पारंपरिक वाद्यांचा गजर हे विशेष आकर्षण असणार आहे. सकाळी १०.३० वाजता सुवासिनींकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल.
दुपारी १२.४५ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी दरवर्षी विजयपूर शहर आणि जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा महोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माता रेणुका यल्लाम्मा देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.


Recent Comments