Belagavi

हॉटेलमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याला बेळगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Share

बेळगावमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या सोन्याच्या साखळी चोरीचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हुबळी येथील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बेळगावमधील देशमुख रोडवरील उदय भवन हॉटेलमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास करत असताना टिळकवाडी पोलिसांनी हुबळी येथील विद्यानगरचा रहिवासी अविनारा रुद्रप्पा खरसांग (३९) याला अटक केली. आरोपीकडून ९५,००० रुपये किमतीची ८.४८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर तांत्रिक पथकाच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

खडेबाजार उपविभागाच्या एसीपींच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पीआय परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. या पथकात पीएसआय विश्वनाथ घंटांमठ, प्रभाकर डोळ आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अत्यंत चाणाक्षपणे चोरट्याला जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाच्या कामगिरीचे बेळगावचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

Tags: