शिक्षण क्षेत्र आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजाराम पाटील यांचा भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.


स्वामी विवेकानंद एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या निरंतर समाजकार्याची दखल घेऊन भारतीय माजी सैनिक संघटनेने त्यांना ‘गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी निवृत्त ऑनररी कॅप्टन एस. मोकाशी यांच्या हस्ते राजाराम पाटील यांचा शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी पाटील यांनी दिलेले निस्वार्थ योगदान अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
शिक्षण आणि समाजसेवा ही केवळ कृती नसून ती एक जबाबदारी आहे, अशा भावना सत्कारमूर्ती राजाराम पाटील यांनी व्यक्त केल्या. पुरस्कारांपेक्षा शोषित वर्गाची सेवा करण्यात मिळणारे समाधान मोठे असल्याचे राजाराम पाटील यांनी म्हटले. या सोहळ्याला वीरमाता, वीरनारी आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments