Belagavi

व्यंकटेश तहसीलदार ठरला ‘बेळगाव श्री’; मराठा युवा मंचतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धेचे दिमाखदार आयोजन

Share

बेळगाव येथील मराठा युवा मंचतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत व्यंकटेश तहसीलदार याने ‘बेळगाव श्री’ किताबावर नाव कोरले, तर ओम विजय पाटील याला ‘बेस्ट पोझर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठा मंदिर येथे आयोजित या ६० व्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या पिळदार देयष्टीचे प्रदर्शन केले. ५५ किलो वजनी गटात शुभम चौगुले, ६० किलोमध्ये उमेश गंगाणे, ६५ किलोमध्ये महेश पाटील, ७० किलोमध्ये सुनील भातकांडे, ७५ किलोमध्ये व्यंकटेश तहसीलदार, ८० किलोमध्ये अमर गुरव आणि ८० किलोवरील गटात व्ही. बी. किरण यांनी प्रथम क्रमांक पटकावले.

विविध वजनी गटांतील चुरशीच्या लढतीनंतर व्यंकटेश तहसीलदार याने सर्वांत प्रभावी कामगिरी करत मुख्य ‘बेळगाव श्री’ किताबावर कब्जा केला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मराठा युवा मंचचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती, चंद्रकांत गुंडकल, मोहन चौगुले, अविनाश पाटील यांच्यासह ‘मिस्टर एशिया’ व ‘एकलव्य’ पुरस्कार विजेते सुनील आपटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: