विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हलगंसी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयाला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध केला. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालय बंद राहत असल्याने पशुपालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हलगंसी येथील हे रुग्णालय परिसरातील सात गावांसाठीचे एकमेव उपचार केंद्र आहे. मात्र, येथील डॉक्टर आणि कर्मचारी कर्तव्यावर वेळेवर हजर राहत नसल्याने उपचारासाठी आणलेल्या जनावरांना ताटकळत राहावे लागते. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने पशुधनाच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अकार्यक्षम कारभाराचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावले.
“सात गावांतील पशुधनासाठी असलेले हे रुग्णालय डॉक्टरांच्या दांडीमुळे नावापुरतेच उरले आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Recent Comments