बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील शिरस्तेदार प्रवीण मादर यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने महसूल विभागाने एक कार्यक्षम आणि मनमिळावू अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

मूळचे खानापूर येथील रहिवासी असलेले प्रवीण मादर यांनी सरकारी सेवेत अत्यंत साधेपणाने, कर्तव्यनिष्ठेने आणि जनस्नेही अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कार्यालयातील कर्मचारी, त्यांचे सहकारी आणि मित्रमंडळींमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रवीण मादर यांच्या अकाली निधनाबद्दल प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मादर यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे.


Recent Comments