Belagavi

बेळगावात श्री समादेवी जन्मोत्सव आणि देवी दरबारचे थाटात उद्घाटन

Share

बेळगावमधील समादेवी गल्ली येथील श्री समादेवी संस्थान आणि वैश्यवाणी समाजातर्फे वार्षिक जन्मोत्सव तसेच ‘देवी दरबार’चे गुरुवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. वैश्यवाणी युवा संघटना आणि महिला मंडळाच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्याने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी प्रा. शालिनी चौगुले यांनी दीपप्रज्वलन आणि रिबन कापून देवी दरबारचे रीतसर उद्घाटन केले. यावेळी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले, तर प्रा. शीतल चौगुले यांनी ‘मी भारतमाता’ या विषयावर अभ्यासपूर्ण आत्मकथन सादर केल्याची माहिती शालिनी चौगुले यांनी दिली.

व्यासपीठावर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, युवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पिळणकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा सटवाणी, उपाध्यक्ष शुभांगी देवलापूरकर आणि सचिव मंजुषा देवलापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याला ट्रस्टी सुरेश पिळणकर, सुधीर मदली, राकेश कलघटगी, राहुल गावडे, समीर अनगोळकर यांच्यासह वैश्यवाणी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनीषा हणमशेट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मंजुषा देवलापूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानल्याचे महादेव गावडे यांनी सांगितले.

Tags: