विजापूर मधील चडचण तालुक्यातील मरगूर येथील मुरारजी देसाई निवासी शाळेत विद्यार्थ्यांनी धूम्रपान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या खोलीत सामूहिकपणे सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन देशाचे भविष्य घडवणे अपेक्षित असताना, शालेय वयातच त्यांना अशा व्यसनांची जडणघडण होत असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. ही घटना वस्तीगृह अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे घडली असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित वॉर्डनवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी लावून धरली आहे.


Recent Comments