बेळगाव मधील केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल येळ्ळूर गावातील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांतील अतुलनीय कार्याची दखल घेऊन डॉ. प्रभाकर कोरे यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येळ्ळूर भागाशी कोरे यांचे जिव्हाळ्याचे नाते असून, त्यांनी या परिसरात चॅरिटेबल हॉस्पिटलची स्थापना केली आहे. यामुळे गरिबांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याची आठवण यावेळी ग्रामस्थांनी करून दिली.
डॉ. कोरे यांनी केएलई संस्थेच्या माध्यमातून बेळगावचे नाव जगभर पोहचवले आहे. त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने हा सन्मान दिला असून, ही बाब येळ्ळूर ग्रामस्थांसाठीही अभिमानास्पद असल्याचे बबन कानशिडे यांनी म्हटले.
या प्रसंगी निवृत्त क्रीडा अधिकारी विलास घाडी, रावजी पाटील, सतीश पाटील यांच्यासह विविध संघटनांच्या प्रमुखांनी डॉ. कोरे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.


Recent Comments