बेळगावमधील जुना गुडशेड रोड येथील गोडसे कॉलनी परिसरात एका महाकाय नागसापाने दर्शन दिल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल फोंडू पाटील यांच्या घरासमोरील पायरीखाली हा साप दडून बसला होता.

सुमारे ६ फूट लांबीचा हा अस्सल नागसाप असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र रामा पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे चार तासांच्या थरारक आणि अथक परिश्रमानंतर त्यांनी सापाला शिताफीने पकडले. हा साप अंदाजे आठ वर्षांचा असून शहराच्या भरवस्तीत इतका मोठा नाग आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सापाला पकडल्यानंतर रामा पाटील यांनी उपस्थितांना सापांविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली.
पकडलेल्या नागाला सुरक्षितरीत्या दूरवर जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे रामा पाटील यांनी सांगितले. वन्यजीवाचे प्राण वाचवल्याबद्दल आणि नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल विठ्ठल पाटील व स्थानिक रहिवाशांनी रामा पाटील यांचे अभिनंदन करून आभार मानले.


Recent Comments