Belagavi

एबीव्हीपी उत्तर कर्नाटक प्रांत सह-सचिवपदी कुशल घोडगेरी यांची निवड

Share

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कर्नाटक उत्तर प्रांताच्या राज्य सह-सचिवपदी कुशल घोडगेरी यांची निवड करण्यात आली आहे. विजापूर येथे २४ ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या परिषदेच्या ४५ व्या प्रांत अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली.

कुशल घोडगेरी यांनी यापूर्वी एबीव्हीपीमध्ये विविध पदांवर यशस्वीपणे काम केले आहे. त्यांनी बेळगाव शहर सह-सचिव, बेळगाव विभाग सोशल मीडिया प्रमुख तसेच कर्नाटक उत्तर प्रांताचे सोशल मीडिया प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते बेळगाव जिल्हा संयोजक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन आता त्यांची राज्य सह-सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags: