Belagavi

मराठा मंदिरमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार; युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते प्रारंभ

Share

बेळगावच्या मराठा युवा संघातर्फे आयोजित ६० व्या शरीरसौष्ठव स्पर्धेचा प्रारंभ युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला असून, या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना आरोग्याचा संदेश देण्यात आला.

बेळगावच्या मराठा मंदिरमध्ये मराठा युवा संघातर्फे आयोजित ६० व्या शरीरसौष्ठव स्पर्धेला युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी हिरवा कंदील दाखवला. मराठा युवा संघ गेल्या सहा दशकांपासून सातत्याने क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देत असून, यंदाची ही ६० वी स्पर्धा क्रीडाप्रेमींचे मुख्य आकर्षण ठरली. प्रमुख पाहुणे राहुल जारकीहोळी यांनी दीपप्रज्वलन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेकडो तरुणांनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी बोलताना मिस्टर आशिया आणि एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर यांनी कौतुक केले. मराठा युवा संघाने उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ अनेक खेळाडूंच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरले आहे. अशा क्रीडा स्पर्धा तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवतात आणि सुदृढ समाज घडवण्यासाठी पूरक ठरतात, अशी प्रतिक्रिया सुनील आपटेकर यांनी दिली.

या कार्यक्रमाला संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Tags: