Belagavi

महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य महिला कर्मचारी संघटनेचा संकल्प

Share

सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कर्नाटक राज्य महिला कर्मचारी संघटना कटिबद्ध असून, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे आश्वासन संघटनेच्या जिल्हाध्यक्षा गीता दळवाई यांनी दिले आहे.

बुधवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, महिला अधिकाऱ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे, योग शिबिरे आणि रक्तदान शिबिरे घेतली जातील, असे दळवाई यांनी सांगितले. महिलांना वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक स्तरावर सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी वीणा होसमनी यांनी माहिती दिली की, कर्नाटक राज्य महिला कर्मचारी संघटनेची स्थापना २०२३ मध्ये झाली होती. राज्यभरातील सर्व तालुक्यांमध्ये सक्रिय असलेली आमची संघटना सरकारी महिला अधिकाऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जात आहे. संकटकाळात पीडित महिला अधिकाऱ्यांचा आवाज बनून संघटना कार्य करत आहे, अशी प्रतिक्रिया वीणा होसमनी यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला मल्लम्मा रेड्डी, डॉ. कृपालिनी गडदवर, राजेश्वरी विजापूर, कस्तुरी कल्लोळी, रश्मी देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.

Tags: