Belagavi

हिंदू संमेलन समितीच्या वतीने पूर्वतयारी स्पर्धांचे उत्साहात आयोजन

Share

हिंदू संमेलन समितीच्या वतीने ६ फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘विराट हिंदू संमेलना’च्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पूर्वतयारी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये गायन, रंगोळी, ललिता सहस्रनाम पठण, पारंपारिक खेळ आणि विनाअग्नी स्वयंपाक अशा विविध स्पर्धांचा समावेश असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या श्रृंखलेतील गायन आणि रंगोळी स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या आहेत. २५ जानेवारी रोजी मांतश नगर येथील ग्लास हाऊसमध्ये गायन स्पर्धा पार पडली. यामध्ये महिला आणि मुलांसाठी दोन स्वतंत्र गट करण्यात आले होते. स्पर्धकांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी आणि दर्जेदार लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. महालक्ष्मी महिला मंडळ, मांतश नगर यांच्या सहकार्याने ही गायन स्पर्धा पार पडली.

या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुख्य हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमात केला जाणार आहे. स्थानिक संस्कृती आणि परंपरांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Tags: