बेळगावातील ज्येष्ठ पत्रकार एम. एन. पाटील यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनसमयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक अनुभवी दुवा निखळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एम. एन. पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत ‘युएनआय’ या वृत्तसंस्थेत वार्ताहर म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘डेक्कन हेराल्ड’ या इंग्रजी दैनिकातही सेवा बजावली. सध्या ते बेळगावच्या ‘लोकदर्शन’ या दैनिकात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.


Recent Comments