खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलप्रभा नदीत हिरेमुनवळ्ळी पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

सापडलेला मृतदेह सुमारे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील पुरुषाचा आहे. या व्यक्तीच्या कमरेला दोरा आणि एक ताईत बांधलेला आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. या वर्णनाची कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास, त्यांनी तातडीने नंदगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Recent Comments