बेळगाव: “विरोधक केवळ भाषणात हिंदू धर्माचा जप करतात, मात्र मी प्रत्यक्षात १५२ मंदिरे बांधून हिंदू संस्कृती जोपासली आहे,” अशा शब्दांत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिंदोळी येथे विरोधकांचा समाचार घेतला.


बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिंदोळी गावात मंगळवारी ७ कोटी रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्ते, गटारी आणि पेव्हर्स बसवण्याच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

मी हात बांधून बसणारी स्त्री नसून, मंत्र्यांकडे पाठपुरावा करून मतदारसंघासाठी निधी खेचून आणत आहे. गेल्या ७ वर्षांत ग्रामीण मतदारसंघाचे नाव मी विकासकामांत राज्यात अव्वल केले आहे. तुम्ही मला तुमची मुलगी मानले असून, मी, माझा भाऊ चन्नराज आणि मुलगा मृणाल हे केवळ राजकारणासाठी नव्हे, तर तुमचे प्रेम आणि जनसेवा करण्यासाठीच मैदानात आहोत,” असे भावनिक आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनीही मनोगत व्यक्त करत गेल्या ७ वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात सुरेश पाटील, राजू पाटील, शीला तिप्पण्णगोळ, निंगप्पा शहापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments