बेळगावच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रेडाईतर्फे ‘बेलकॉन २०२६’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शाकांभरी पौर्णिमा उत्सवाच्या काळात होणाऱ्या या मेळाव्यामुळे ग्राहकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल.


शहरातील सीपीएड मैदानावर ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत हे भव्य प्रदर्शन भरणार आहे. यामध्ये निवासी संकुले, व्यावसायिक गाळे आणि प्लॉटिंग संदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येईल, असे क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि गुणवत्ता टिकवून ठेवणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे सचिव प्रशांत वांडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, अध्यक्ष युवराज हुलजी यांनी प्रदर्शनातील तांत्रिक सोयी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबाबत माहिती देऊन सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, असे त्यांनी म्हटले.


Recent Comments