Belagavi

येळेबैल येथील पारायण सोहळ्यात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची उपस्थिती

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील येळेबैल गावात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक श्री जगद्गुरु तुकाराम गाथा पारायण आणि भव्य रिंगण सोहळ्यात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी रिंगण सोहळ्याचे दर्शन घेतले आणि स्वतः पारायणात सहभागी झाल्या. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. “वारकरी संप्रदायाची ही परंपरा मनाला ऊर्जा आणि शांती देणारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मकर संक्रांतीचे औचित्य साधून हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची बेळगाव येथील गृह कार्यालयात भेट घेतली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी मंत्री महोदयांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा उपसंचालक चेतनकुमार, बेळगाव ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO) सुमित्रा, खानापूर तालुक्याचे सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी विक्रम यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: