Belagavi

कोल्हापूरमधील स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सचा दबदबा

Share

कोल्हापूर येथील सचिन टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीतर्फे आयोजित ‘शिवसमर्थ खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत’ बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण १२ पदके पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ३०० हून अधिक नामवंत स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगावच्या जानवी तेंडुलकर (२ सुवर्ण), शल्य तरळेकर (२ सुवर्ण), सौरभ साळोखे (२ सुवर्ण), आरशान माडीवाले (१ सुवर्ण, १ कांस्य), अमिषा वेर्णेकर (२ रौप्य) आणि प्रीतम बागेवाडी (२ रौप्य) यांनी आपल्या कौशल्याने पदकांची कमाई केली.

हे सर्व खेळाडू केएलई सोसायटी आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंकवर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांनी त्यांचे अभिनंदन करून प्रोत्साहन दिले आहे.

Tags: