चिक्कोडी तालुक्यातील प्रसिद्ध क्षेत्र येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आमदार गणेश हुक्केरी यांनी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

येडूर येथे १७ ते १९ जानेवारी दरम्यान श्री वीरभद्रेश्वर महारथोत्सव आणि जात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी बैठकीत आमदार हुक्केरी बोलत होते. यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांना पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, विद्युत पुरवठा आणि सुरक्षा यांसारख्या आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश आमदार हुक्केरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यात्रेच्या सुरक्षेबाबत माहिती देताना डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा यांनी सांगितले की, गर्दीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल आणि संपूर्ण सोहळ्यावर सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाईल. तहसीलदार राजेश बुर्ली यांनीही सर्व विभागांच्या समन्वयाने भक्तांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला ता.पं. कार्यकारी अधिकारी रवी हुक्केरी, हेस्कॉमच्या अभियंता सुप्रभा बंडगार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments