उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून, यानिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात यावर्षी १५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. तोरवी येथील ३० एकर परिसरात भरलेल्या या यात्रेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले आहेत.


या जनावरांच्या बाजारात १ लाखापासून ७ लाखांपर्यंत बैलांची जोडी विक्री होत आहे. बाजारात खिल्लार, जवारी, जर्सी अशा विविध जातींच्या बैलांची मोठी आवक असून खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे. जनावरांच्या सुविधेसाठी सिद्धेश्वर संस्था व जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची सोय केली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

येथे उत्कृष्ट जनावरांना सिद्धेश्वर समितीच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. चांगला दर मिळत असल्याने विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


Recent Comments