बेळगाव शहरातील रामनगर वडरवाडी परिसरात १२ व्या शतकातील थोर शिवशरण आणि कायकयोगी श्री सिद्धरामेश्वर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सिद्धरामेश्वर यांनी समाजासाठी दिलेला सेवाकार्याचा संदेश आणि त्यांचे विचार आजही समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या सोहळ्यात स्थानिक नेते राहूल बडस्कर, मारुती बडस्कर, महेश गाडीवड्डर, शेट्टप्पा कागलकर आणि नागेश अष्टेकर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून पूजेचा मान स्वीकारला. सिद्धरामेश्वर यांनी तलाव आणि विहिरींच्या निर्मितीतून दिलेल्या लोकसेवेच्या संदेशाचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांच्या वचन साहित्यातील तत्त्वे अंगीकारण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.
या कार्यक्रमाला गुंडू बडस्कर, सुरेश गाडीवड्डर, राहूल कागलकर आणि हनुमंत कागलकर यांच्यासह वडरवाडी समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री सिद्धरामेश्वर यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


Recent Comments