Belagavi

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात संक्रांतीचा उत्साह

Share

मकर संक्रांतीच्या निमित्ताने बेळगावचे ऐतिहासिक श्री कपिलेश्वर मंदिर तीळ आणि गुळाच्या मिश्रणाने केलेल्या विशेष अलंकाराने उजळून निघाले होते. दक्षिणकाशी मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तीळ-गुळाचा हा नयनरम्य श्रृंगार भाविकांचे मुख्य आकर्षण ठरला असून शिवभक्तांनी रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला.

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कपिलेश्वर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतानाच्या या मुहूर्तावर भाविकांनी शिवशंभोचे दर्शन घेऊन पुण्य पदरात पाडले. मंदिराच्या आवारात भाविकांना तीळ-गुळाचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या विशेष सजावटीमुळे मंदिराला एक आगळेवेगळे रूप प्राप्त झाले होते.

बेळगाव शहरासह ग्रामीण भागातून हजारो भाविकांनी कपिलेश्वर मंदिरात हजेरी लावून अभिषेक आणि अर्चना केली. कडाक्याच्या थंडीतही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. संपूर्ण मंदिर परिसर शिवनामाच्या जयघोषाने आणि संक्रांतीच्या मंगलमय वातावरणाने भक्तीमय झाला होता, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.

Tags: